Coconut Development Scheme in Maharashtra / महाराष्ट्र मध्ये नारळ विकास योजना

Coconut Development Scheme (In English)

कृषि व शेतकरी कल्याण मंत्रालय (नारळ विकास महामंडळ) महाराष्ट्र शासनाने सुरू केली नारळ विकास योजना. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे नारळ लागवडीखालील क्षेत्रात वाढ घडवून आणणे, एकात्मिक शेतीद्वारे नारळ बागांच्या उत्पादकतेत वाढ घडवून आणणे, शास्त्रोक्त पध्दतीचा अवलंब करण्यासाठी प्रात्याक्षिक क्षेत्राची स्थापना करणे, रोपवाटिका स्थापन करुन दर्जेदार नारळ रोपांचे उत्पादन व वितरण करणे, सेद्रिय खताचे युनिट स्थापन करणे, या योजने अंतर्गत नारळाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना धनादेशा द्वारे अर्थसहाय्य केले जाणार आहे. यामध्ये जास्त वयाची तसेच रोगग्रस्त अनुत्पादक नारळ झाडे काढून टाकण्यासाठी शेतकऱ्याला प्रतिझाड रु. २५० याप्रमाणे प्रतिहेक्टरी जास्तीत जास्त रक्कम रु. ३७५० मिळतील आणि नारळाच्या उत्पादकता वाढविण्यासाठी प्रशिक्षणासाठी उपयुक्त क्षेत्र उभारले जाईल. महाराष्ट्रातील सर्व नारळ पीक उत्पादक शेतकरी या योजनेला अर्ज करू शकतात. अधिक माहिती आणि अर्जाचा फॉर्म जवळच्या कृषी कार्यालय, महाराष्ट्र सरकार येथे मिळवता येतो.

नारळ विकास योजनेचे फायदे:

  • योजना नारळ पीक उत्पादक शेतक-यांना फायदे देते. या योजनेअंतर्गत लाभ आर्थिक मदत स्वरूपात दिले जातात

या योजने अंतर्गत नारळाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना धनादेशा द्वारे अर्थसहाय्य केले जाणार आहे. यामध्ये जास्त वयाची तसेच रोगग्रस्त अनुत्पादक नारळ झाडे काढून टाकण्यासाठी शेतकऱ्याला प्रतिझाड रु. २५० याप्रमाणे प्रतिहेक्टरी जास्तीत जास्त रक्कम रु. ३७५० मिळतील

  • नारळ बागांची उत्पादकता वाढविण्यासाठी प्रात्याक्षिके आयोजित केली जाणार आहेत

शेतकऱ्यांसाठी प्रात्याक्षिक क्षेत्राची स्थापना केली जाणार आहे

नारळ विकास योजनेसाठी अर्ज करिता पात्रता आणि अटी:

  1. महाराष्ट्रातील शेतकरी निवासी
  2. या योजनेसाठी नारळ पीक उत्पादक शेतकरी अर्ज करू शकतात

नारळाच्या विकासासाठी आवश्यक कागदपत्रे:

  1. आधार कार्ड
  2. ओळख पुरावा
  3. नमुन 8 ए
  4. 7/12
  5. बँकेच्या पासबुकची प्रत
  6. अर्जाचा फॉर्म (कार्यालयात उपलब्ध)
  7. रहिवासी पुरावा
  8. टीपः योजना इतर दस्तऐवज घेऊ शकते याची कृपया पुष्टी करा

नारळ विकास योजनेसाठी अर्ज प्रक्रिया:

  1. अर्जदार शेतक-याने पात्रता निश्चित करणे आवश्यक आहे आणि कृषि कार्यालय किंवा नारळाच्या विकास मंडळाला भेट देणे आवश्यक आहे
  2. अर्जाचा फॉर्म त्याच कार्यालयात उपलब्ध आहे
  3. कृपया अर्जाचा फॉर्म काळजीपूर्वक भरा आणि त्याच कार्यालयात सादर करा

संपर्काची माहिती:

  1. अर्जदार शेतकरी जवळच्या शेती कार्यालयाशी संपर्क साधू शकतात
  2. कृषी अधिकारी
  3. नविन नारळ विकास मंडळाशी शेतकरी संपर्क साधू शकतात

संदर्भ आणि तपशील:

  1. दस्तऐवज आणि इतर मदतीबद्दल अधिक तपशीलासाठी कृपया अधिकृत वेबसाइटला भेट द्या: https://goo.gl/NKuI4
  2. https://goo.gl/v3Tce9
  3. शासन निर्णय: https://govinfo.me/wp-content/uploads/2017/10/G-S-14.pd
Coconut Insurance Scheme in Maharashtra

Coconut Insurance Scheme in Maharashtra / महाराष्ट्र मध्ये नारळ विमा योजना

Financial Assistance Scheme for Organic Fertilizer Production Unit in Maharashtra

Financial Assistance Scheme for Organic Fertilizer Production Unit in Maharashtra / महाराष्ट्र मध्ये जैविक खत उत्पादन युनिट उभारणीसाठी अर्थसहाय्य योजना