Horticulture Disease Consultation and Management Project in Maharashtra / महाराष्ट्र मध्ये फलोत्पादन पिकावरील कीड रोग सर्वेक्षण, सल्ला व व्यवस्थापन योजना

Horticulture Disease Consultation and Management Project (In English)

कृषि व शेतकरी कल्याण मंत्रालय महाराष्ट्र यांनी फलोत्पादन पिकावरील कीड रोग सर्वेक्षण, सल्ला व व्यवस्थापन योजना प्रकल्पाची घोषणा केली. या योजनेचे प्रमुख उद्दीष्ट शेतक-यांना आंबा, डाळिंब, केळी, संत्र, मोसंबी व चिकू या सर्व फाळला कीटक, रोग यांपासून संरक्षण देण्याचे आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना औषधांच्या खरेदीसाठी 50 टक्के अनुदानासह कीटक आणि रोग नियंत्रणासाठी काय करावे हे जाणून घेण्यासाठी तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रशिक्षण दिले जाते. ही योजना शेतक-यांना फलोत्पादनास प्रोत्साहन देते आणि शेतक-यांना योग्य सल्ला व व्यवस्थापन पुरवून सर्व फाळला कीटक, रोग यांपासून संरक्षण देते. महाराष्ट्रातील सर्व शेतकरी निवासी या योजनेसाठी अर्ज करू शकतात. अधिक माहिती आणि अर्जाचा फॉर्म जवळच्या कृषी कार्यालय, महाराष्ट्र सरकार येथे मिळवता येतो.

फलोत्पादन रोग सल्ला आणि व्यवस्थापन प्रकल्प फायदे:

  • योजना आंबा, डाळिंब, केळी, संत्रा, मोसंबी व चिकू फसल उत्पादक शेतक-यांना फायदे देते. या योजनेअंतर्गत लाभ आर्थिक मदत आणि कीटक व रोगापासून पीक संरक्षित करण्यासाठी सल्लामसलत म्हणून दिला जातो
  • या योजने अंतर्गत कीटक आणि रोग नियंत्रणासाठी काय करावे हे जाणून घेण्यासाठी लाभार्थ्याला तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रशिक्षण देण्यात येते
  • आंबा, डाळिंब, केळी, संत्रा, मोसंबी व चिक्कू या पिकांना किडीपासून वाचविण्यासाठी फायदा होऊ शकेल. जसे की, कीड नियंत्रणासाठी काय करावे याचे माहिती तंत्रज्ञान हे प्रशिक्षणाद्वारे मिळेल
  • वेळ प्रसंगी ५० % अनुदानावर तालुकास्तरावरून औषधे उपलब्ध करून दिली जातील

फलोत्पादन रोग सल्ला आणि व्यवस्थापन प्रकल्पासाठी आवश्यक पात्रता आणि अटी:

  1. महाराष्ट्रातील शेतकरी निवासी
  2. आंबा, डाळिंब, केळी, संत्रा, मोसंबी आणि चिकू शेतकरी किंवा फलोत्पादन करणारे शेतकरी

फलोत्पादन रोग सल्ला व व्यवस्थापन प्रकल्पासाठी आवश्यक असलेले कागदपत्र:

  1. नमुना 8 ए
  2. 7/12
  3. आधार कार्ड
  4. ओळख पुरावा
  5. अर्जाचा फॉर्म (कार्यालयात उपलब्ध)
  6. निवासी पुरावा
  7. टीप: योजना इतर दस्तऐवज घेऊ शकते कृपया याची पुष्टी करा

फलोत्पादन रोग सल्ला आणि व्यवस्थापन प्रकल्पासाठी अर्ज प्रक्रिया:

  1. अर्जदार शेतक-याने पात्रतेची पुष्टी करणे आवश्यक आहे व कृषी कार्यालयाला भेट देणे आवश्यक आहे
  2. अर्जाचा फॉर्म त्याच कार्यालयात उपलब्ध आहे
  3. कृपया अर्जाचा फॉर्म काळजीपूर्वक भरा आणि त्याच कार्यालयात सादर करा

संपर्काची माहिती:

  1. अर्जदार शेतकरी जवळच्या मंडळ कृषि अधिकारीशी संपर्क साधू शकतात
  2. तालुका कृषि अधिकारी
  3. जिल्हा कृषी अधिकारी

संदर्भ आणि तपशील:

  1. दस्तऐवज आणि इतर मदतीबद्दल अधिक तपशीलासाठी कृपया अधिकृत वेबसाइटला भेट द्या: https://goo.gl/NKuI4
  2. शासन निर्णय: https://govinfo.me/wp-content/uploads/2017/10/G-S-6.pdf
Maharshtra Karj Mafi

Maharashtra Karj Mafi Yojna List 2017 (Chhatrapati Shivaji Maharaj Shetkari Sanman Yojana) / महाराष्ट्र कर्ज माफी २०१७ लाभार्थ्यांची यादी (छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना)

Cotton Development Scheme in Maharashtra under NFSM

Cotton Development Scheme in Maharashtra under NFSM / महाराष्ट्र मध्ये कापूस विकास योजना