Mukhyamantri Krishi Sanjeevani Yojana launched in Maharashtra / थकबाकी असलेल्या कृषी पंप धारकांसाठी मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना

Mukhyamantri Krishi Sanjeevani Yojana launched in Maharashtra (in English)

ऊर्जा मंत्री महाराष्ट्र राज्य श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी थकबाकी असलेल्या कृषी पंप धारकांसाठी मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना सुरु केली आहे. या योजनेद्वारे राज्य सरकार थकबाकी असलेल्या कृषी पंप धारकांचे थकीत वरचे दंड आणि व्याज माफ करणार आहे. सततच्या नापिकी आणि दुष्काळामुळे महाराष्ट्रातील शेतकरी विजेचे बिल भरू शकले नाही आणि आत्महत्या करत असल्यामुळे सरकारने शेतकऱ्यांचे थकीत बिलावरील व्याज आणि दंड माफ करीत आहे. या योजनेचा लाभ ४१ लाख शेतकऱ्यांना होईल आणि सरकला थकीत १९,२७२ कोटी मिळतील असा अंदाज आहे.

मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेची वैशिष्ठये:

  • माहे एप्रिल ते जून २०१७ चे चालू बिल भरून शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल
  • मार्च २०१७ च्या आधीची थकबाकी ५/१० हफ्त्यात भरून दंड आणि व्याज माफ करण्यात येईल
  • थकीत रक्कम डिसेंबर २०१७, मार्च २०१८, जून २०१८, सप्टेंबर २०१८ आणि डिसेंबर २०१८ अश्या हफ्त्यात भरावी लागेल
  • सर्व थकबाकी भरणाऱ्या शेतकऱ्यांना दंड आणि व्याज माफी देण्यात येईल

मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेसाठी पात्रता:

  • थकबाकी असलेले कृषी पम्प धारक
  • चालू बिल एप्रिल ते जून २०१७ चे बिल ५ नोव्हेंबर २०१७ च्या आधी भरणारे कृषी पम्प धारक
  • मार्च २०१७ च्या आधीचे थकीत डिसेंबर २०१८ च्या आधी भरणारे कृषी पम्प धारक

दिनांक ३१ मार्च २०१७ अखेरीस असलेली मूळ थकबाकी खालील प्रमाणे हफ्त्यात भरावी लागेल

  • मूळ थकबाकी ३०,००० पेक्षा कमी असेल तर ५ मासिक हफ्त्यात भरावी लागेल
  • मूळ थकबाकी ३०,००० पेक्षा जास्त असेल तर १० डिड महिन्याच्या हफ्त्यात भरावी लागेल

मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना 2017 साठी अर्ज करण्याची पद्धत / वीज बिल माफी साठी अर्ज कसा करावा?
१. कृषी पंपाचे चालू बिल एप्रिल ते जून २०१७, ५ नोव्हेंबर २०१७ च्या आधी भरावे
२. मूळ थकबाकी ३०,००० पेक्षा कमी असेल तर ५ मासिक हफ्त्यात भरावे
३. मूळ थकबाकी ३०,००० पेक्षा जास्त असेल तर १० डिड महिन्याच्या हफ्त्यात भरावे
४. जवळच्या इलेक्ट्रिसिटी बोर्डाच्या ऑफिस ला भेट द्या आणि वीज बिल भरणा शिबिरात सहभागी व्हा

Mukhyamantri Krishi Sanjeevani Yojana

अधिक माहितीसाठी:

  • महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड: http://www.mahadiscom.in/
Scholarship Scheme

Dakshina Scholarship Scheme in Maharashtra / महाराष्ट्र राज्य शासनाची दक्षिणा अधिछात्रवृत्ती योजना

Indian Bank

Campaign by Indian Bank to offer MUDRA Yojana Loan / मुद्रा योजना ऋण इंडियन बैंक का अभियान