Coconut Insurance Scheme (In English)
कृषि व शेतकरी कल्याण मंत्रालय, महाराष्ट्र शासन यांनी सुरू केलेल्या नारळ विमा योजना. या योजनेचा मुख्य उद्देश नारळाच्या पिक उत्पादन करणाऱ्या शेतकऱयांचे कल्याण, नारळ उत्पादकांना नैसर्गिक आपत्तीमुळे नारळांच्या झाडांना होणा-या नुकसानीस विमा संरक्षण देणे, नारळ पीकांची अकाली उत्पादकता नष्ट झाल्यामुळे होणा-या नुकसानीस अर्थिक सहाय्य देणे, नारळ उत्पादनातील धोके कमी करुन उत्पादकांना पुर्नलागवड व नारळ बागेचे पुनरज्जीवन करण्यास प्रोत्साहन देऊन नारळ शेती अधिक फायदेशीर बनविणे, नारळासाठी शेतक-यांना प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक मदत देण्यासाठी उत्पादन. या योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनातर्फे विम्याचा २५% हप्ता भरला जातो, विमा हप्त्यातील अधिकांश रक्कम नारळ पीक उत्पादक संघ भरू शकते. जास्तीत जास्त ५० % म्हणजेच कमी किमतीमध्ये आपल्या नारळ पिकाला विम्याचे संरक्षण मिळते. महाराष्ट्रातील सर्व नारळ पीक उत्पादक शेतकरी या योजनेला अर्ज करू शकतात. अधिक माहिती आणि अर्जाचा फॉर्म जवळच्या कृषी कार्यालय, महाराष्ट्र सरकार येथे मिळवता येतो.
नारळ विमा योजनेचे फायदे:
- योजना नारळ पीक उत्पादक शेतक-यांना फायदे देते. या योजने अंतर्गत नारळ पीक उत्पादक शेतक-यांना विमा देण्यात येतो
- या योजनेअंतर्गत 25% विमा हप्त्याचा भरणा महाराष्ट्र शासनाने केला आहे
- विमा हप्त्यातील अधिकांश रक्कम नारळ पीक उत्पादक संघ भरू शकते. जास्तीत जास्त ५० %
- नारळाच्या पीक उत्पादकांना थोडक्यात कमी किमतीमध्ये आपल्या नारळ पिकाला विम्याचे संरक्षण मिळते.
नारळ विमा योजनेसाठी आवश्यक पात्रता आणि अटीः
- महाराष्ट्रातील शेतकरी निवासी
- या योजनेसाठी नारळ पीक उत्पादक शेतकरी अर्ज करू शकतात
नारळ विमा योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे:
- ओळख पुरावा
- अर्ज (कार्यालयात उपलब्ध)
- नमुन 8 अ
- 7/12
- बँकेच्या पासबुकची प्रत
- निवासी पुरावा
- आधार कार्ड
- टीपः योजना इतर दस्तऐवज घेऊ शकते याची कृपया पुष्टी करा
नारळ विमा योजनेसाठी अर्ज प्रक्रिया:
- अर्जदार शेतक-याने पात्रतेची पुष्टी करणे आवश्यक आहे व कृषी कार्यालयाला भेट देणे आवश्यक आहे
- अर्जाचा फॉर्म त्याच कार्यालयात उपलब्ध आहे
- कृपया अर्जाचा फॉर्म काळजीपूर्वक भरा आणि त्याच कार्यालयात सादर करा
संपर्काची माहिती:
- अर्जदार शेतकरी जवळच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधू शकतात
- कृषी अधिकारी
संदर्भ आणि तपशील:
- 1. दस्तऐवज आणि इतर मदतीबद्दल अधिक तपशीलासाठी कृपया अधिकृत वेबसाइटला भेट द्या: https://goo.gl/NKuI4
- https://goo.gl/v3Tce9