Book Bank Scheme for Scheduled Caste Students in Maharashtra
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्य सरकारने अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांसाठी बुक बँक योजना सुरु केली आहे. या योजनेला भारत सरकारचा आर्थिक पाठिंबा आहे. या योजने अंतर्गत वैद्यकीय, अभियांत्रिकी, कृषी क्षेत्रातील अनुसूचित जातीतील विध्यार्थाना महाराष्ट्र सरकार पुस्तक बँक प्रदान करते. या योजनेचा उद्देश विध्यार्थाना शैक्षणिक मदत करणे आहे.
बुक बँक योजनेचे फायदे:
- मेडिकल आणि अभियांत्रिकीच्या विध्यार्थ्यांसाठी २ विष्यार्थी मिळून १ पुस्तकांचा संच आणि ७,००० रुपये अनुदान
- कृषी विद्यार्थ्यांसाठी फायदे दोन विद्यार्थी मिळून १ पुस्तक संच आणि ४,५०० अनुदान
- पशुवैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी फायदे दोन विद्यार्थी मिळून १ पुस्तक संच आणि ५००० अनुदान
- वैद्यकीय, अभियांत्रिकी, कृषी आणि पशुवैद्यकीय विद्यार्थी सारखे पदव्युत्तर अभ्यासक्रम: प्रत्येक विध्यार्थ्याला १ पुस्तक संच आणि ५,००० रुपये
बुक बँक ही योजना पात्रता:
- अर्जदार हा महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे
- अर्जदार अनुसूचित जातीचाअसणे आवश्यक आहे
- वैद्यकीय, अभियांत्रिकी, कृषी, इ विध्यार्थ्यांना हि योजना लागू आहे
- विद्यार्थी भारत शिष्यवृत्ती योजना साठी पात्र असावा
बुक बँक ही योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे:
- पासपोर्ट आकाराचे फोटो
- आधार कार्ड
- जातीचा दाखला
- जात वैधता प्रमाणपत्र
- रहिवासी दाखला
- बँक खाते तपशील
बुक बँक ही योजना अर्ज करण्याची पद्धत:
- संबंधित कॉलेज / संस्थेला संपर्क करावा
- महाराष्ट्रात सहाय्यकआयुक्त समाज कल्याण विभागामध्ये संपर्क करावा
आणखी माहिती:
- महाराष्ट्र भेट अनुसूचित जाती विद्यार्थ्यांसाठी बुक बँक योजना विषयी अधिक माहिती करीता: https://sjsa.maharashtra.gov.in/en/scheme-category/education-training?&Submit=Submit&page=2
- https://mahaschemes.maharashtra.gov.in/en/education-and-training-scheme.html