Soil Health Card Scheme in Maharashtra Under National Sustainable Agriculture Mission / महाराष्ट्र मध्ये राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत मृदा आरोग्यपत्रिका योजना

Soil Health Card Scheme in Maharashtra (In English)

कृषि व शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार द्वारे सुरू आणि राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत महाराष्ट्र शासनाने राबविण्यात येणारी मृदा आरोग्यपत्रिका योजना. या योजनेचे प्रमुख उद्दीष्ट माती नमून्यांच्या तपासणीनंतर  मृद आरोग्य पत्रिका उपलब्ध करुन देणे आणि मृद आरोग्य सुधारण्यासाठी तसेच मुलद्रव्यांची परिणामकारकता वाढविण्यासाठी जैविक खते, सेंद्रीय खते, गांडूळ खत, निंबोळी/सल्फर आच्छादित युरियासारख्या संथ गतीने नत्र पुरवठा करणा-या खतांच्या वापरास प्रोत्साहन देणे. या योजने अंतर्गत लाभार्थी शेतक-यांनी निशुल्क माती नमून्यांच्या तपासणीनंतर मृद आरोग्य पत्रिका उपलब्ध करुन देण्यात येतात. महाराष्ट्रातील सर्व शेतकरी निवासी या योजनेसाठी अर्ज करू शकतात. अधिक माहिती आणि अर्जाचा फॉर्म जवळच्या जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी कार्यालय येथे मिळवता येतो.

राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत मृदा आरोग्यपत्रिका योजनेचे फायदे:

  • माती नमून्यांच्या तपासणीनंतर मृद आरोग्य पत्रिका उपलब्ध करुन देण्यात येतात, निशुल्क
  • मृद आरोग्य सुधारण्यासाठी तसेच मुलद्रव्यांची परिणामकारकता वाढविण्यासाठी जैविक खते, सेंद्रीय खते, गांडूळ खत, निंबोळी/सल्फर आच्छादित युरियासारख्या संथ गतीने नत्र पुरवठा करणा-या खतांच्या वापरास प्रोत्साहन देण्यात येते

राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत मृदा आरोग्यपत्रिका योजनेसाठी पात्रता आणि शर्ती:

  1. महाराष्ट्रातील शेतकरी निवासी

राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत मृदा आरोग्यपत्रिका योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे:

  1. आधार कार्ड
  2. ओळख पुरावा
  3. नमुना 8 अ
  4. 7/12
  5. बँकेच्या पासबुकची प्रत
  6. अर्जाचा फॉर्म (कार्यालयात उपलब्ध)
  7. रहिवासी पुरावा
  8. टीपः योजना इतर दस्तऐवज घेऊ शकते याची कृपया पुष्टी करा

राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत मृदा आरोग्यपत्रिका योजनेसाठी अर्ज प्रक्रिया:

  1. अर्जदार शेतक-याने पात्रतेची पुष्टी करणे आवश्यक आहे व जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी कार्यालय भेट देणे आवश्यक आहे
  2. अर्जाचा फॉर्म त्याच कार्यालयात उपलब्ध आहे
  3. कृपया अर्जाचा फॉर्म काळजीपूर्वक भरावा आणि त्याच कार्यालयात सादर करा

संपर्काची माहिती:

  1. अर्जदार शेतकरी जवळच्या जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी कार्यालय
  2. तालुका कृषि अधिकारी
  3. जिल्हा कृषी अधिकारी
  4. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी

संदर्भ आणि तपशील:

  1. कागदपत्र आणि इतर मदतीबद्दल अधिक तपशीलासाठी कृपया अधिकृत वेबसाइटला भेट द्या: https://goo.gl/NKuI4
  2. शासन निर्णय: https://govinfo.me/wp-content/uploads/2017/10/G-S-24-min.pdf
Green Fodder Development Scheme in Maharashtra under RKVY

Green Fodder Development Scheme in Maharashtra under RKVY / महाराष्ट्र मध्ये गतिमान वैरण विकास योजना

Disabled Schemes

Unique Identity Card (UIC) for people with disabilities / दिव्यांगों के लिए यूनिक आइडेंटिटी कार्ड