Special Education and Vocational Training through Non-Governmental Aided Organization for Disabled in Maharashtra
सरकारी संस्था माध्यमातून विशेष शिक्षण आणि व्यावसायिक प्रशिक्षण देण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्य सरकारने ही योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकार शारिरीकरित्या अपंगत्व आलेलया मुलांना मोफत शिक्षण आणि व्यावसायिक प्रशिक्षण देते . या योजनेत, अन्न, निवारा, वस्त्र आणि शिक्षण यांसारख्या मोफत सुविधा महाराष्ट्र सरकार द्वारे दिल्या जातात. या योजनेचा प्रमुख उद्देश 6 ते 18 वर्षे वयोगटातील अपंग मुलांना मोफत शिक्षण व व्यावसायिक प्रशिक्षण देणे हा आहे.
सरकारी संस्था माध्यमातून विशेष शिक्षण आणि व्यावसायिक प्रशिक्षण योजनेचे फायदे:
- 6 ते 18 वर्षे वयोगटातील अपंग मुलांना मोफत शिक्षण व व्यावसायिक प्रशिक्षण देणे
- 18 वर्षे पूर्ण असलेल्या अपंग मुलांना व्यावसायिक प्रशिक्षण देणे
- अन्न, निवारा, वस्त्र आणि शिक्षण यांसारख्या मोफत सुविधा विकलांग मुलांना पुरविणे
सरकारी संस्था माध्यमातून विशेष शिक्षण आणि व्यावसायिक प्रशिक्षण योजनेची पात्रता:
- अर्जदार किमान 40% अपंगत्व असणे आवश्यक आहे
- अर्जदार ममहाराष्ट्राचा अधिवासी असला पाहिजे
- अर्ज दिलेलया स्वरूपात असला पाहिजे
सरकारी संस्था माध्यमातून विशेष शिक्षण आणि व्यावसायिक प्रशिक्षण योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे:
- आधार कार्ड
- अपंगत्त्वाचे प्रमाणपत्र
सरकारी संस्था माध्यमातून विशेष शिक्षण आणि व्यावसायिक प्रशिक्षण योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत:
- अर्जदाराणे आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडून पुढील पत्त्यावर पाठवावे
- अर्जदार, अपंग, जिल्हा समाज कल्याण कार्यालय, जिल्हा परिषद व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, मुंबई शहरी व मुंबई उपनगर सरकारी संस्था येथे संपर्क साधावा
संपर्काची माहिती:
- महाराष्ट्र राज्य अपंग संस्था आयुक्त, 3 चर्च रोड, पुणे-411001.