महाराष्ट्र सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटी तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. आता १५ सप्टेंबर ऐवजी २२ सप्टेंबर पर्यंत अर्ज भरता येतील. आता पर्यन्त ९८ लाख शेतकऱ्यांनी अर्ज भरला असून अजूनही ४४ लाख शेतकरी अर्ज भरू शकले नाही. १८-१८ तास वीज नसल्यामुळे आणि सर्वर बंद असल्यामुळे लांब रांगांमध्ये दिवस दिवस उभे राहूनही अर्ज भारत आले नाही. आणि म्हणून राज्य सरकार ने हा निर्णय जाहीर केला असून दिवाळी पहिले कर्ज माफीचे पैसे देण्याचा निर्धार सरकार ने घेतला आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: २२ सप्टेंबर
- छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना: https://govinfo.me/chhatrapati-shivaji-maharaj-shetkari-sanman-yojana-maharashtra-shetkari-karz-mafi-yojana/
- अर्जाची प्रक्रिया: https://govinfo.me/procedure-apply-chhatrapati-shivaji-maharaj-shetkari-sanman-yojana-karj-mafi-yojna/
SOURCE: ABP Maza