Financial Assistance Scheme for Organic Fertilizer Production Unit (In English)
कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय, महाराष्ट्र शासन यांनी जैविक खत उत्पादन युनिट उभारणीसाठी अर्थसहाय्य योजना सुरू केली. या योजनेचा मुख्य उद्देश शेती उत्पादनात सेंद्रीय खतांचा वापर वाढवणे, जैविक उर्वरके वापरण्यास प्रोत्साहित करण्यासाठी, खाजगी / अर्ध-खाजगी / खाजगी क्षेत्रातील जैव उर्वरक उत्पादनास चालना देणे हे आहे. या योजने अंतर्गत लाभार्थी शेतक-यांना जैविक खत उत्पादन युनिट उभारणीसाठी आवश्यक असलेल्या सर्व खर्चाच्या आर्थिक सहाय्य म्हणून 25% रक्कम दिली जाते किवा जैविक खत उत्पादन युनिटकरीता यंत्र सामुग्री, काच सामान, रसायने, कच्चा माल, पॅकींग, साहीत्य खरेदी करण्यासाठी अनुदान मिळते. महाराष्ट्रातील शेतकरी निवासी ह्या योजनेत अर्ज करू शकतात. अधिक माहिती आणि अर्जाचा फॉर्म जवळच्या कृषी कार्यालय, महाराष्ट्र सरकार येथे मिळवता येतो.
जैविक खत उत्पादन युनिट उभारणीसाठी अर्थसहाय्य योजनेचे फायदे:
- शेतक-यांना योजनेचा लाभ मिळतो या योजनेअंतर्गत लाभ आर्थिक मदत स्वरुपात देण्यात येतात
- या योजने अंतर्गत लाभार्थी शेतक-यांना जैविक खत उत्पादन युनिटकरीता यंत्र सामुग्री, काच सामान, रसायने, कच्चा माल, पॅकींग, साहीत्य खरेदी करण्यासाठी अनुदान मिळते. हे अनुदान खर्चाच्या २५% किंवा जास्तीत जास्त २५% इतके असते
- या योजने अंतर्गत लाभार्थी शेतक-यांना जैविक खत युनिट स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व खर्चाच्या आर्थिक सहाय्य म्हणून 25% रक्कम प्राप्त करणे
जैविक खत उत्पादन युनिट उभारणीसाठी अर्थसहाय्य योजनेसाठी अर्ज करित आवश्यक पात्रता आणि अटी:
- महाराष्ट्रातील शेतकरी निवासी
- लाभार्थी संस्था कंपनी काय्ध्यांतर्गत एसएसआय युनिट म्हणून नोंदणीकृत असणे आवश्यक राहील
- सेंद्रीय खत युनिटचे उत्पादन दरवर्षी किमान 150 मेट्रीक टन असावे
- आर्थिक सहाय्य मंजूर झाल्यावर खत उत्पादन सुरू करणे अनिवार्य आहे
जैविक खत उत्पादन युनिट उभारणीसाठी अर्थसहाय्य योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे:
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- आधार कार्ड
- ओळख पुरावा
- बँकेच्या पासबुकची प्रत
- अर्जाचा फॉर्म (कार्यालयात उपलब्ध आहे किंवा डाउनलोड केला जाऊ शकतो)
- निवासी पुरावा
- टीप: योजना इतर दस्तऐवज घेऊ शकते कृपया याची पुष्टी करा
जैविक खत उत्पादन युनिट उभारणीसाठी अर्थसहाय्य योजनेसाठी अर्ज प्रक्रिया:
- अर्जदार शेतक-याने पात्रतेची पुष्टी करणे आवश्यक आहे व कृषी कार्यालयाला भेट देणे आवश्यक आहे
- अर्जाचा फॉर्म त्याच कार्यालयात उपलब्ध आहे
- अर्जाचा फॉर्म खाली नमूद केलेल्या संकेतस्थळ वरून डाउनलोड केला जाऊ शकतो
- कृपया अर्ज काळजीपूर्वक भरा आणि त्याच कार्यालयात सादर करा
संपर्काची माहिती:
- अर्जदार शेतकरी जवळच्या मंडळ कृषि अधिकारीशी संपर्क साधू शकतात
- तालुका कृषि अधिकारी
- जिल्हा कृषी अधिकारी
- कृषी कार्यालयाचे जिल्हा अधिक्षक
संदर्भ आणि तपशील:
- दस्तऐवज आणि इतर मदतीबद्दल अधिक तपशीलासाठी कृपया अधिकृत वेबसाइटला भेट द्या: https://goo.gl/NKuI4
- अर्जाचा फॉर्म: https://govinfo.me/wp-content/uploads/2017/10/S-23.pdf
- शासन निर्णय: https://govinfo.me/wp-content/uploads/2017/10/G-S-23.pdf