Pramod Mahajan Skills and Entrepreneurship Development Scheme (In English)
कौशल्य विकास आणि उद्योजक मंत्रालयाने प्रमोद महाजन कौशल्य आणि उद्योजकता विकास योजना सुरू केली. या योजनेचा मुख्य हेतू राज्यातील सर्व इच्छुक उमेदवारांना उद्योगांमध्ये रोजगार / स्वयंरोजगार संधी देण्यासाठी कौशल्य प्रदान करणे आहे. या योजनेअंतर्गत अर्जदारास विविध क्षेत्रात प्रशिक्षण दिले जाते उदा. बांधकाम, उत्पादन, वस्त्रोद्योग, ऑटोमोबाईल, आरोग्यसेवा, बँकिंग, वित्त व विमा, संघटित रिटेल, फार्मास्युटिकल आणि केमिकल्स, माहिती तंत्रज्ञान, एग्रो प्रोसेसिंग इत्यादी. महाराष्ट्रातील अनेक बेरोजगारांना नोकरी मिळण्यासाठी, स्वयंरोजगारीसाठी किंवा व्यवसाय स्थापित करण्यासाठी सर्व इच्छुक उमेदवार या योजनेला अर्ज करू शकतात. अधिक माहिती अधिकृत वेबसाइट किंवा महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास संस्थेला भेट देऊन मिळवता येते
प्रमोद महाजन कौशल्य आणि उद्योजकता विकास योजनेचे फायदे:
- योजना महाराष्ट्रातील सर्व इच्छुक उमेदवारांच्या फायद्यासाठी लाभ प्रदान करते
- या योजनेअंतर्गत उमेदवारांना खालील कोर्स “विनामूल्य” प्रशिक्षण दिले जाते
- बांधकाम, उत्पादन, वस्त्रोद्योग, ऑटोमोबाईल, आरोग्य सेवा, बँकिंग, वित्त व विमा, संघटित रिटेल, फार्मास्युटिकल आणि केमिकल्स, माहिती तंत्रज्ञान, कृषी प्रक्रिया इ.
प्रमोद महाजन कौशल्य आणि उद्योजकता विकास योजनेसाठी अर्जा करीता आवश्यक पात्रता आणि अटी:
- महाराष्ट्र राज्यातील रहिवासी
- रोजगार / स्वयंरोजगार / उद्योजकता मध्ये इच्छुक असलेल्या अर्जदाराला योजनेत अर्ज करू शकतात
प्रमोद महाजन कौशल्य आणि उद्योजकता विकास योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:
- आधार कार्ड
- ओळख पुरावा
- निवासी पुरावा
- शैक्षणिक प्रमाणपत्रे उदा. मार्कपत्र इ.
- टीप: योजना इतर दस्तऐवज घेऊ शकते कृपया याची पुष्टी करा प्रमोद महाजन कौशलों आणि उद्योजकता विकास योजनेसाठी अर्ज प्रक्रिया खाली नमूद केलेल्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्जदार अर्ज करू शकतो
संपर्काची माहिती:
- महाराष्ट्र राज्य कौशल डेव्हलपमेंट सोसायटी, चौथा मजला, एमटीएनएल बिल्डिंग, जी. डी. सोमानी मार्ग, कफ परेड, मुंबई 400 005 वर अर्जदार संपर्क साधू शकतो
संदर्भ आणि तपशील:
- कागदपत्रांबद्दल आणि इतर मदतीबद्दल अधिक तपशीलासाठी कृपया अधिकृत वेबसाइटला भेट द्या: https://goo.gl/ojtDwg
- शासन निर्णय: https://govinfo.me/wp-content/uploads/2017/10/G-S-60.pdf
- ऑनलाइन अर्ज: https://goo.gl/ojtDwg