Tin Stalls to Gatai Kamgar Scheme
महाराष्ट्र सरकार आणि सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या राज्य सरकारने गटई कामगारांना पत्र्यांचे स्टॉल पुरविणे योजना सुरु केली आहे. या योजने अंतर्गत गटई कामगारांना पत्र्यांचे स्टॉल उपलब्ध करून देण्यात येते. टिन स्टॉल करता सरकार १००% अनुदान देते या सहित ५०० रुपयांचे अर्थ साहाय्य देण्यात येते. ही योजना लेदर पादत्राणे आणि चामड्याच्या वस्तू या तयार करणाऱ्या अनुसूचित जातीतील व्यक्तींसाठी आहे जेणे करून त्यांचे सामाजिक आणि आर्थिक उत्थान होईल. सोबतच हे टिन स्टॉल कामगारांना ऊन, पाऊस व वार या पासून रक्षण करेल.
गटई कामगारांना पत्र्यांचे स्टॉल पुरविणे योजनेचा लाभ:
- तीन स्टॉल उभारण्याकरिता १००% अनुदान
- ५०० रुपये अनुदान
गटई कामगारांना पत्र्यांचे स्टॉल पुरविणे योजनेसाठी पात्रता:
- अर्जदार अनुसूचित जातीचा असावा
- अर्जदार हा महाराष्ट्र राज्यातील वास्तव्याचा असावा
- अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागात ४०,००० रुपये व शहरी क्षेत्रात ५०,००० रुपयांपेक्षा कमी असावे
- अर्जदार किमान 18 वर्षे वयाचा असणे आवश्यक आहे
- तीन स्टॉल साठी प्रायोजित जागा अर्जदाराची स्वतःची किंवा भाड्याची अथवा ग्राम पंच्यात/महानगर पालिकेने भाडयाने दिलेली किंवा संमती दिलेली असावी
गटई कामगारांना पत्र्यांचे स्टॉल पुरविणे योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे:
- अर्जदाराचे आधार कार्ड
- अर्जदाराचे जातीचे प्रमाणपत्र
- अर्जदाराचे उत्पन्न प्रमाणपत्र
गटई कामगारांना पत्र्यांचे स्टॉल पुरविणे योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत:
- अर्जदार सहाय्यक आयुक्त, महाराष्ट्र जिह्वा समाज कल्याण कार्यालयात अर्ज सादर करणे आवश्यक आहे
- अर्जदार देखील ग्राम पंचायत किंवा महानगरपालिकेत संपर्क करू शकतात
गटई कामगारांना पत्र्यांचे स्टॉल पुरविणे योजनेची आणखी माहिती:
- गटई कामगारांना पत्र्यांचे स्टॉल पुरविणे योजनेसाठी अर्ज: http://mahades.maharashtra.gov.in/MPSIMS/ViewSchemeProfile.do?mode=printProfile&recordId=1365&planYearId=2015
- गटई कामगारांना पत्र्यांचे स्टॉल पुरविणे योजनेची आणखी माहिती: https://sjsa.maharashtra.gov.in/en/scheme-category/economic-upliftment