Sugarcane Development Scheme (In English)
कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारे सुरू करण्यात आलेली आणि राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाने राबविलेली ऊस विकास योजना. या योजनेचा मुख्य उद्देशः तंत्रज्ञाना द्वारे उस विकासासाठी शेतकरी व कर्मचा-यांना प्रशिक्षण देने आणि वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून बियाण्याची गुणवत्ता वाढविणे आहे. अधिक माहिती आणि अर्जाचा फॉर्म जवळच्या कृषी कार्यालय, महाराष्ट्र सरकार येथे मिळवता येतो.
ऊस विकास योजनेचे फायदे:
- शेतक-यांना आर्थिक सहाय्य आणि प्रशिक्षण या स्वरूपात योजना लाभ प्रदान करते
- या योजने अंतर्गत ऊस उत्पादकतेत वाढ करण्यासाठी शेतक-यांना प्रात्यक्षिक दाखवून दिले जाईल
- रु. 8 हजार प्रात्यक्षिकांसाठी प्रति हेक्टर दिले जाते
ऊस विकास योजनेसाठी पात्रता आणि शर्ती:
- महाराष्ट्रातील शेतकरी निवासी
- ऊस उत्पादक शेतकरी या योजनेला अर्ज करू शकतो
ऊस विकास योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे:
- आधार कार्ड
- ओळख पुरावा
- नमुना 8 अ
- 7/12
- बँकेच्या पासबुकची प्रत
- अर्जाचा फॉर्म (कार्यालयात उपलब्ध)
- रहिवासी पुरावा
- टीपः योजना इतर दस्तऐवज घेऊ शकते याची कृपया पुष्टी करा
ऊस विकास योजनेसाठी अर्ज प्रक्रिया:
- अर्जदार शेतक-याने पात्रतेची पुष्टी करणे आवश्यक आहे व कृषी कार्यालयाला भेट देणे आवश्यक आहे
- अर्जाचा फॉर्म त्याच कार्यालयात उपलब्ध आहे
- कृपया अर्जाचा फॉर्म काळजीपूर्वक भरावा आणि त्याच कार्यालयात सादर करा
संपर्काची माहिती:
- अर्जदार शेतकरी जवळच्या मंडळ कृषि अधिकारीशी संपर्क साधू शकतात
- तालुका कृषि अधिकारी
- जिल्हा कृषी अधिकारी
संदर्भ आणि तपशील:
- कागदपत्र आणि इतर मदतीबद्दल अधिक तपशीलासाठी कृपया अधिकृत वेबसाइटला भेट द्या: https://goo.gl/NKuI4
- शासन निर्णय: https://govinfo.me/wp-content/uploads/2017/10/G-S-19.pdf